ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नव्याने बांधलेल्या राम गणेश गडकरी रंगायतन या आधुनिक आणि सुसज्ज सभागृहाचे लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडणार आहे.नव्याने नूतनीकरण करण्यात आलेल्या गडकरी रंगायतन चे लोकार्पण महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मा. ना. श्री. एकनाथ संभाजी शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून मा. ना. श्री. गणेश नाईक आणि मा. ना. श्री. प्रताप सरनाईक उपस्थित राहणार आहेत.

तसेच, खासदार मा. डॉ. श्रीकांत शिंदे, मा. श्री. नरेश म्हस्के, मा. डॉ. श्री. जितेंद्र आहेर, मा. श्री. संजय केळकर, मा. श्री. संजीव नाईक, मा. अॅड. श्री. निरंजन डावखरे, मा. सुहासिनी जाधव, आणि अमित भूते यांची मान्यवर उपस्थिती राहणार आहेत.कार्यक्रमाचे संचालन संदीप मापारी आणि अनंत वारे करतील.हा सोहळा शुक्रवार, १५ ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी २ वाजता, राम गणेश गडकरी रंगायतन, डॉ. मुंढे रोड, ठाणे (प.) येथे पार पडेल.ठाणेकरांसाठी हा एक ऐतिहासिक क्षण ठरणार असून, सांस्कृतिक, नाट्य आणि कलाविश्वाला एक नवे व्यासपीठ मिळणार आहे.