

गेल्या ३ दिवसांपासून ठाण्यात मुसळधार पाऊस पडत असून काल सकाळ पासून ठाणे शहरात पाडणाऱ्या पावसाच जोर वाढल्याने ठाणे शहरातील विविध ठिकाणी पाणी साचल्याचे पहायला मिळाले. त्यातच या मुसळधार पावसामुळे सोसाट्याचा वारा सुटत असल्याने काही ठिकाणी संरक्षक भिंत व वृक्ष उन्मळून पडण्याच्या घटना घडल्या आहेत त्यातच आज मुसळधार पावसामुळे वागळे इस्टेट येथील राम नगर परिसरात ठाणे महानगरपालिकेने बसवलेली लोखंडी कमान अचानक कोसळली सदर घटचेनेची माहिती मिळताच ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापना व अग्निशमन दल दाखल झाले. त्यानंतर ती कोसळलेली लोखंडी कमान बाजूला करण्याचे काम ठाणे महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन दलाने केले मात्र या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी न झाल्याची माहिती ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिलीये.

