February 9, 2026

📰 ठाण्यात खेळ मंगळागौर कार्यक्रमाचे आयोजनठाणे – ठाण्यात शिवसेना ठाणे जिल्हा शाखा आणि शिवसेना महिला आघाडी यांच्या वतीने भव्य “खेळ मंगळागौरीचा २०२५” कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा सांस्कृतिक कार्यक्रम रविवार, १७ ऑगस्ट २०२५ रोजी सायंकाळी ५ वाजता गडकरी रंगायतन, डॉ. मूस रोड, तलावपाळी ठाणे येथे पार पडणार आहे.

या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना ठाणे जिल्हा शाखा व समस्त महिला आघाडी यांच्या पुढाकाराने होत असून, ठाणे महानगरपालिका महापौर सौ. मीनाक्षी राजेंद्र शिंदे या प्रमुख आयोजक आहेत.

कार्यक्रमाला ठाण्याच्या लाडक्या वहिनी सौ. लता एकनाथ शिंदे यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. यावेळी महाराष्ट्रातील अनेक सुप्रसिद्ध गायक व कलाकार उपस्थित राहून आपल्या कला-सादरीकरणातून ठाणेकरांना आनंदित करणार आहेत.

संगीत, नृत्य आणि पारंपरिक खेळांची रेलचेल असलेल्या “खेळ मंगळागौरीचा २०२५” या सोहळ्यात ठाणेकर महिलांसाठी खास सांस्कृतिक मेजवानी उपलब्ध होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *