📰 ठाण्यातील वागळे इस्टेट परिसरात पहिल्यावहिला दहीहंडी उत्सव भव्य उत्साहात पार पडला
ठाणे – नगरसेवक एकनाथ भोईर फाउंडेशन व स्वराज्य प्रतिष्ठान व यांच्या वतीने काल (शनिवार, दि. १६ ऑगस्ट २०२५)भव्य दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. हा पहिला सोहळा असल्याने ठाणेकरांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण होते.
या सोहळ्यात पहिल्या क्रमांकाच्या मानाच्या गोविंद पथकाला तब्बल ₹११ लाख ५१ हजार रुपयांचे बक्षीस व आकर्षक ट्रॉफी देण्यात आली. तसेच इतर क्रमांकाच्या गोविंद पथकांना अनुक्रमे ₹२१,०००, ₹११,०००, ₹९,००० आणि ₹३,००० अशी पारितोषिके देण्यात आली. महिलांच्या गोविंद पथकांसाठीही स्वतंत्र बक्षिसांची सोय करण्यात आली होती.


या आयोजनात युवासेना अध्यक्ष यज्ञेश भोईर यांनी मोठी जबाबदारी सांभाळत उत्सव यशस्वी करण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान दिले. त्यांच्या सक्रिय सहभागामुळे दहीहंडी उत्सव अधिक भव्य आणि सुरळीत पार पडला.
या प्रसंगी नगरसेवक एकनाथ भोईर म्हणाले की, “हा दहीहंडी उत्सव आम्ही यंदा पहिल्यांदाच आयोजित केला असून, यापुढे दरवर्षी ठाण्यात या उत्सवाची परंपरा सुरू ठेवणार आहोत.”
गोविंदांच्या जल्लोषात संपूर्ण वागळे इस्टेट दहीहंडीमय झाले. अनेक गोविंदा पथकांनी स्वराज्य प्रतिष्ठानच्या दहिहंडी उत्सवात सलामी दिली. तरी “मोरया गोविंदा पथकाने” ह्या वर्षीची स्वराज्य प्रतिष्ठानच्या दहिहंडी फोडून मानाचा किताब पटकावला.


