

दि. १५ ऑगस्ट २०२५संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ठाणे महानगरपालिका व श्री. ज्ञानदेव सेवा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.या सोहळ्यात पारंपरिक वेशभूषा, टाळ-चिपळ्यांचा नाद आणि अभंगांच्या गजरात भाविकांनी उत्साहाने सहभाग घेतला. भक्ती, परंपरा आणि संस्कृती यांचे अनोखे दर्शन या सोहळ्यात घडले.या प्रसंगी कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार माननीय श्री. निरंजन डावखरे व ठाणे शहर आमदार माननीय श्री. संजय केळकर यांनी उपस्थित राहून श्रद्धा भावाने सहभाग नोंदविला.दिंडी सोहळ्यामुळे संपूर्ण ठाणे शहर भक्ती रसात रंगून गेले असून, संत परंपरेच्या स्मरणातून समाजात एकात्मता, श्रद्धा व सांस्कृतिक अभिमान वृद्धिंगत झाल्याचा संदेश मिळाला.

