February 7, 2026

ठाणे महानगरपालिकेच्या वतीने देशाचा ७९ वा स्वतंत्रता दिवस मोठ्या उत्साहात पार पडला. देशाच्या ७९ व्या स्वातंत्र्य दिनानिमित ठाणे महापालिका मुख्यालयात ठाणे महापालिकेचे आयुक्त श्री सौरभ राव ह्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर राष्ट्रध्वजास अग्निशमन दल तसेच टी डी आर एफ चे जवान यांनी मान्यवरांच्या उपस्थित राष्ट्रध्वजास मान वंदना दिली.

त्यानंतर ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री सौरभ राव ह्यांचा हस्ते ठाणे महापालिकेच्या विविध प्रभाग समिती मध्ये कार्यरत असणाऱ्या आणि उल्खेनीय काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांचा सन्मान माननीय आयुक्त श्री सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आला. तसेच ठाणे शहरात विविध ठिकाणी कचरा संकलनाचे उल्खेणीय कार्य करणाऱ्या स्वच्छता दूतांचेही सन्मान करण्यात आला. यावेळी ठाणे महानगरपालिका आयुक्त श्री सौरभ राव, अतिरिक्त आयुक्त श्री संदीप माळवी तसेच अतिरिक्त आयुक्त श्री प्रशांत रोडे उपयुक्त जी जी गोदेपुरे, उपयुक्त शंकर पाटोळे, उमेश बिरारी, जनसंपर्क अधिकारी रवींद्र मांजरेकर सह ठाणे महापालिकेचे अधिकारी कर्मचारी व माजी लोकप्रतिनिधी या ध्वजारोहण सोहळ्याला उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *