एका सर्वसामान्य पोलीस कुटुंबावर आलेल्या अचानक वैद्यकीय संकटासंकटात मानवी सहवेदना आणि जबाबदार लोकप्रतिनिधींची तत्पर मदत यामुळे एक महत्त्वपूर्ण जीवन वाचवण्यात यश आले. ठाणेशहर पोलीस दलातील पोलीस शिपाई सौ मनिषा बारमाळे यांना अचानक रुग्णालयात दाखल करावे लागले आणि उपचारांसाठी मोठ्या आर्थिक खर्चाची गरज होती. त्यांना मुलुंड येथील फोर्टीज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले, अगोदर हॉस्पिटल प्रशासनाने हे ऑपरेशन पोलीस वैद्यकीय योजनेच्या अंतर्गत होईल असे सांगितले मात्र नंतर हे पोलीस योजनेच्या अंतर्गत होऊ शकत नाही असे फोर्टिस हॉस्पिटल प्रशासनाने सांगितले. अचानक एवढे चार ते पाच लाख कुठून उभे करायचे हा गंभीर प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला.परिस्थिती इतकी बिकट झाली की घरातील सोनं गहाण ठेवण्याची वेळ आली होती.जे कायद्याचे रक्षक आहेत त्यांनाच जर न्याय मिळत नसेल तर ही बाब खरोखरच गंभीर होती.म्हणून मदत मिळण्यासाठी भाजपा कार्यकर्ते दत्ता घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ही बाब लगेच आमदार श्री निरंजन डावखरे यांना सांगितली त्यांनी

लगेच अशा कठीण प्रसंगी मदतीचा हात पुढे करत तत्काळ मुख्यमंत्री सहाय्यता निधीमार्फत व मुख्यमंत्री कार्यालय मार्फत आवश्यक ती मदत मिळण्यासाठी रात्रंदिवस पाठपुरावा केला आणि ती मदत मिळवून दिली.या सर्व प्रयत्नांमुळे दोन दिवसात मुख्यमंत्री कार्यालय व मुख्यमंत्री वैद्यकीय मदत निधी कक्षा तर्फे पाठपुरावा केल्यामुळे ते ऑपरेशन पोलीस वैद्यकीय योजनेअंतर्गत फोर्टिस हॉस्पिटल प्रशासनाकडून करून घेण्यात आले. वैद्यकीय उपचार सुरळीत पार पडले असून त्या ठाणे शहर पोलीस तरुणीला आता प्रकृती सुधारल्यामुळे आज रुग्णालयातून डिस्चार्ज मिळला आहे.पोलीस शिपाई मनीषा बारमाळे व त्यांच्या कुटुंबाकडून मुख्यमंत्री,आमदार श्री निरंजन डावखरे व मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी कक्ष यांचे आभार व्यक्त केले.ही केवळ मदतीची कथा नसून, माणुसकीच्या नात्याने जोडलेल्या समाजाचे आणि जबाबदार नेतृत्वाचे एक प्रेरणादायी उदाहरण आहे.