
राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री तथा शिवसेना मुख्य नेते मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्या मान्यतेने आणि मार्गदर्शनाखाली शिवसेना अल्पसंख्याक विभागामार्फत नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची घोषणा करण्यात आली. या वेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे साहेब यांच्या हस्ते मुंबई तसेच राज्यातील प्रमुख पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
या कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांची नावे नव्या जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी घोषित करण्यात आली. या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या पुढीलप्रमाणे आहेत :
• हारून खान – मुंबई अध्यक्ष, शिवसेना अल्पसंख्याक विभाग
• सलीम खान – महाराष्ट्र कार्याध्यक्ष, शिवसेना अल्पसंख्याक विभाग
• अफसर खान – महाराष्ट्र कार्याध्यक्ष, शिवसेना अल्पसंख्याक विभाग
• साजेद कुरेशी – युवक कार्याध्यक्ष, शिवसेना अल्पसंख्याक, महाराष्ट्र प्रदेश
या सर्व पदाधिकाऱ्यांचे पक्षाकडून हार्दिक अभिनंदन करण्यात आले असून, त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. शिवसेना अल्पसंख्याक विभागाच्या कार्यामध्ये नवे बळ मिळावे आणि समाजातील सर्व घटकांपर्यंत पक्षाचे धोरण पोहोचावे, या हेतूने ही नियुक्ती प्रक्रिया पार पडली.
शिवसेना अल्पसंख्यांक विभागाचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष सईद खान यांनी कळविले असून त्यांचे अनेक सहकारी व पदाधिकारी या प्रसंगी उपस्थित होते.