July 28, 2025

आज ठाणे शहरात मा. मुख्यमंत्री श्री. देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मुख्यमंत्री सचिवालय, मुख्यमंत्री सहाय्यता निधी, तसेच धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्यमंत्री सामुदायिक आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमास कोकण पदवीधर मतदार संघाचे आमदार मा. निरंजनजी डावखरे यांचा पुढाकार लाभला, ज्यात गरजू नागरिकांपर्यंत मोफत व दर्जेदार आरोग्यसेवा पोहोचवण्याच्या उद्देशाने दर महिन्याच्या शेवटच्या रविवारी हे शिबिर आयोजित करण्यात येत आहे.

आजच्या शिबिरात २५०० पेक्षा अधिक नागरिकांनी नोंदणी केली असून, शिबिरात अनेक चाचण्या आणि रोगनिदान करण्यात आले. या वेळी तज्ज्ञ डॉक्टरांकडून सविस्तर तपासणी करून आवश्यक रुग्णांसाठी शस्त्रक्रियेची सुविधा पुरविण्यात येणार आहे. यात आज रक्त, लघवी व ECG तपासणी, आणि आयुष्मान भारत कार्ड नोंदणी झाली. शिबिर स्थळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मन की बात’ या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले, ज्यास नागरिकांनी विशेष प्रतिसाद दिला.

या कार्क्रमाच्या उद्घाटनप्रसंगी सहकार विद्या प्रसारक मंडळ सेकंडरी स्कूलचे पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते, ज्यात संस्थेचे अध्यक्ष डॉ. अमोल भानुशाली, उपाध्यक्ष श्री. चंद्रकांत विघाटे, सचिव श्री. मधुकर पाटील, खजिनदार श्री. प्रदीप म्हात्रे यांनी विशेष हजेरी लावली. तसेच या वेळी ठाणे जिल्हा भाजप मधील अनेक मान्यवर उपस्थित होते. ठाणे जिल्हा माजी महापौर अशोकजी भोईर, माजी ठाणे शहर जिल्हा भाजप अध्यक्ष संजयजी वाघुले, कोकण पदवीधर प्रकोष्ठ सचिन मोरे, माजी नगरसेवक डॉ. मढवी, माजी नगरसेवक मनोहरजी डुंबरे, माजी नगरसेवक नारायणजी पवार, माजी सरचिटणीस विलासजी साठे, माजी मंडल अध्यक्ष सुदर्शन साळवी, सरचिटणीस ठाणे जिल्हा मनोहर सुगदरे, कोपरी मंडल अध्यक्ष कृष्णा भुजबळ, कळवा मंडल अध्यक्ष तेजस मोऱ्या, कृष्णकुमार यादव, मिरा भाईंदर पदवीधर प्रकोष्ठ संयोजक अंशुल मल्होत्रा, तसेच अनेक पदाधिकारी व अनेक मान्यवर कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी हृदयरोग, छातीविकार ज्यात फुफ्फुस तपासणीसाठी विशेष सेवा उपलब्ध करावी, अशी मागणी डॉ भानुशाली यांनी केली. आरोग्य सेवा ही प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि ती सुलभपणे सर्वांपर्यंत पोहोचावी, यासाठी राज्य सरकार कटिबद्ध आहे, असे मान्यवरांनी सांगितले. या उपक्रमामुळे दुर्बल, मध्यमवर्गीय व गरजू नागरिकांसाठी मोठा दिलासा मिळाला असून, राज्य शासनाच्या आरोग्यविषयक प्रयत्नांप्रती नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. मोठ्या संख्येने नोंदणी झाल्या मुळे, आयोजकांनी आपण सर्वांपर्यंत आरोग्य पोहचवू आणि गरज पडल्यास आजून एकदा या ठिकाणी आरोग्य शिबिराचे आयोजन करू असे कळविले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *